Advertisement

ग्रामपंचायत पालोरा येथे समाधान शिबिर, सेवा पंधरवडा योजना कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना राबविन्यात आल्या


ग्रामपंचायत पालोरा येथे समाधान शिबिर, सेवा पंधरवडा योजना कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना राबविन्यात आल्या

परशिवानी: दिनांक २९/९/२०२५ ला ग्रामपंचायत पालोरा येथे समाधान शिबिर, सेवा पंधरवडा योजना कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना राबवितांना व योजनांची माहिती देवतांना मा.तहसीलदार सुरेश जी वाघचैरे साहेब, गटविकास अधिकारी जाधव साहेब पंचायत समिती पारशिवनी, तालुका कृषी अधिकारी , आरोग्य अधिकारी पारशिवनी तालुका, वनविभाग अधिकारी, पोलीस अधिकारी, संजय निराधार समिती अध्यक्ष राजू भोस्कर, संजय निराधार समिती सदस्य रोशन जी पिपरांमुळे,पालोरा गावातील सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत कमेटी सचिव ग्रामपंचायत पोलोरा व गावातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासन आपल्या दारी या शासनाची योजना 

 *आरोग्य विभाग कडून आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्य संबंधित सल्ला व गर्भवती महिलांना पोषक आहार संबंधित माहिती देण्यात आली. 

* कृषी विभागाकडून कृषी संबंधित माहिती व कृषी संबंधित सर्व योजनांची ऑनलाईन शेत तळे, शेती करीत लगनारे अवजारे व उपकरणे, ठिबक सिंचन,फळ बागायती शेती व इतर सर्व योजनांची नोंदणी करण्यासाठी  कागदपत्रांची माहिती देण्यात आली व ऑनलाइन सर्व योजनांची नोंदणी करण्याकरिता शिबिर लावण्यात आले.

 


*महसूल विभागाकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती आधार नोंदणी आधार दुरुस्ती, सातबारा फेरफार व दुरुस्ती, संजय निराधार व श्रावणबाळ योजना च्या लाभार्थ्याची नोंदणी व इतर इतर सर्व योजनांची माहिती देण्यात आली व शिबिर लाऊन कागदपत्रांची माहिती देण्यात आली व ऑनलाइन सर्व योजनांची नोंदणी करण्याकरिता शिबिर लावण्यात आले.

*पंचायत समिती कार्यालयाकडून सुरू असलेल्या सर्व योजनांची माहिती गाव पातळीवर सुरू असलेल्या आर.आर.आबा पाटील स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार माझी  वसुंधरा पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार व इतर सर्व गाव सुंदर करण्यासाठी आहे गावाची  प्रगती करण्याकरिता गाव स्वच्छ करण्याकरिता सुरू असलेल्या पुरस्कार योजनेची माहिती देण्यात आली व घरकुल योजना व इतर सर्व योजनांची नोंदणी करण्याकरिता ऑनलाइन शिबिर लावण्यात आले. 

*पोलीस विभागाकडून सुरक्षा संबंधित व कायद्याची माहिती देण्यात आली. 

*वन विभागाकडून वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले व या करिता सुरक्षा उपाययोजना यांची माहिती देण्यात आली व वृक्ष लागवड करिता झाडे उपलब्ध करून देण्याकरिता माहिती व झाडे  लावण्याकरिता उपस्थित नागरिकांना प्रेरित करण्यात आले. 

शासन आपल्या दारी आल्यामुळे पालोऱा गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या सर्व योजनांचा लाभा घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या